बारामती पोलिसांनी मिरवणुकीत धरला ठेका
पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात निघणाऱ्या मिरवणुकीत अनेक पोलिसांनी नृत्य केल्याने बारामतीतील पोलीस चर्चेचा विषय ठरले होते. पोलीस मिरवणुकीत सहभागी झाले असले तरी सुरक्षिततेच्या बाबतीतही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
आज राज्यभर गणेश विसर्जन मिरवणुका जोरदारपणे होत आहेत. अनेक शहरातून मिरवणुकीसाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असतानाच बारामतीत मात्र गणेश विसर्जन मिरवणुकीत अनेक पोलिसांनी ठेका धरत गणेशाला निरोप दिला आहे. पोलीस खात्यातील अनेक अधिकारी थेट मिरवणुकीत सहभागी होत, वाहतूक पोलिसांसह अनेकांनी ठेका धरल्यानंतर नागरिकांनी पोलिसांचे मिरवणुकीतील नृत्य कॅमेऱ्यामध्ये टिपले आहे. बारामती शहरात अनेक गणेश मंडळांच्या श्रींच्या मुर्तींना निरोप देण्यात येत आहे. बारामती शहरात यावेळी पोलिसांनी ठेका धरल्याने येथील मिरवणूक खास ठरली आहे. पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात निघणाऱ्या मिरवणुकीत अनेक पोलिसांनी नृत्य केल्याने बारामतीतील पोलीस चर्चेचा विषय ठरले होते. पोलीस मिरवणुकीत सहभागी झाले असले तरी सुरक्षिततेच्या बाबतीतही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.