अंगावर खाकी वर्दी मनात विठ्ठलाचा गजर; पोलिस धावले बेलवाडीच्या रिंगणात

| Updated on: Jun 21, 2023 | 9:38 AM

जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील अश्वाचे पहिले गोल रिंगण बेलवाडी येथे आज पार पडले. येथे या रिंगणात पहिल्यांदाच पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सहभाग घेत प्रदक्षिणा घातली. त्याचवेळी टाळ-मृदंगाच्या तालावर ठेका धरत फुगडीचाही आनंदही पोलिसांनी लूटला.

पुणे : विठ्ठलाच्या दर्शनाला आसुसलेला वारकाऱ्यांसाठी रिंगन सोहळा जेवढा ऊर्जादायी असतो तितकाच तो पोलिसांठीही. काल जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील अश्वाचे पहिले गोल रिंगण बेलवाडी येथे आज पार पडले. येथे या रिंगणात पहिल्यांदाच पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सहभाग घेत प्रदक्षिणा घातली. त्याचवेळी टाळ-मृदंगाच्या तालावर ठेका धरत फुगडीचाही आनंदही पोलिसांनी लूटला. पालखी सोहळा सुरू झाल्यापासून अनेक पोलिस कर्मचारी आणि अधिकारी बंदोबस्ताची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतात. ते जबाबदारीची पालखी आपल्या खांद्यावर घेत पालखीबरोबर मार्गस्थ होत असतात. त्यांच्या मनावर बंदोबस्ताचं ताणतणाव हा असतोच. कारण वारी आणि पालखी सोहळा हा वारकऱ्यांसाठी खूप महत्वाचा असतो. मात्र यावेळी हा सगळा ताणतणाव बाजूला सारत पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तुकोबारायांच्या रिंगणात सहभागी झाले.

Published on: Jun 21, 2023 09:38 AM
गोरक्षक हत्येवरून नांदेड हादरलं; आज किनवट बंद
मनीषा कायंदे यांच्यावर अंधारे यांचा निशाना; ‘त्यांनीच पक्ष सोडला आता…’