अक्षय कुमारच्या चित्रपटाच्या सेटवर नियमांचा भंग, मुंबई पोलिसांकडून कडक कारवाई
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) चित्रपटाच्या सेटवर पोलिसांनी (Mumbai Police) कारवाई केली आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) चित्रपटाच्या सेटवर पोलिसांनी (Mumbai Police) कारवाई केली आहे. काल रात्री मुंबईतील मढ (Madh) दाना-पानी येथे अक्षय कुमारच्या एका चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. यावेळी व्हॅनिटी व्हॅन आणि इतर वाहने रस्त्यावर उभी होती. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर मुंबई वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. रस्तावर लावण्यात आलेली सर्व वाहनं पोलिसांनी लॉक केली. रात्री उशिरा मालवणी पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी मिळून शूटिंगसाठी आलेल्या वाहनांवर कारवाई केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा पोलिसांनी कारवाई केली त्यावेळी अक्षय कुमार तिथे नव्हता.त्याआधीच तो आपलं शूटिंग आटपून निघून गेला होता.
Published on: Feb 24, 2022 12:37 PM