Navneet Rana : नवनीत राणांनी पोलिसांची माफी मागावी, पोलीस पत्नी वर्षा भोयर यांची मागणी
वर्षा भोयर यांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन ठिय्या मांडला होता. जोपर्यंत खासदार नवनीत राणांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असा इशाराच वर्षा भोयर यांनी दिला आहे.
खासदार नवनीत राणा यांनी पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांशी हुज्जत घातली. तमाम पोलिसांचा अपमान केला असल्याचा आरोप अमरावतीमधील पोलीस पत्नी व शिवसेना पदाधिकारी वर्षा भोयर यांनी केला आहे. वर्षा भोयर यांच्या नेतृत्वात पोलीस बॉईज संघटनेने दोन दिवसांपूर्वी पोलिसांना नवनीत राणांवर कारवाईसाठी निवेदन देखील दिले. कुठलीही कारवाई न झाल्याने आज पुन्हा वर्षा भोयर यांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन ठिय्या मांडला होता. जोपर्यंत खासदार नवनीत राणांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असा इशाराच वर्षा भोयर यांनी दिला आहे.
Published on: Sep 10, 2022 07:39 PM