Special Report | अकबरुद्दीन ओवैसी औरंगजेबच्या कबरीसमोर नतमस्तक

Special Report | अकबरुद्दीन ओवैसी औरंगजेबच्या कबरीसमोर नतमस्तक

| Updated on: May 13, 2022 | 9:08 PM

तब्बल 49 वर्षे हिंदुस्तानवर राज्य करणाऱ्या औरंगजेबाचे अखेरचे क्षण अहमदनगरच्या भिंगार परिसरात गेले. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा साक्षीदार होण्याची संधी तेव्हा भिंगार शहराला मिळाली. याच  मोगल साम्राज्याचा डोलारा त्या क्षणापासून ढासळायला सुरूवात झाली. त्यावेळी औरंगजेब भिंगार परिसरातच वास्तव्यास होता.

अहमदनगर : एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक झाल्यानंतर राजकीय वाद निर्माण झालाय. मात्र, जरी औरंगजेबचे कबर औरंगाबादलाच असली तरी त्याचा मृत्यू अहमदनगरच्या आलमगीर या ठिकाणी झाला होता. तब्बल 49 वर्षे हिंदुस्तानवर राज्य करणाऱ्या औरंगजेबाचे अखेरचे क्षण अहमदनगरच्या भिंगार परिसरात गेले. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा साक्षीदार होण्याची संधी तेव्हा भिंगार शहराला मिळाली. याच  मोगल साम्राज्याचा डोलारा त्या क्षणापासून ढासळायला सुरूवात झाली. त्यावेळी औरंगजेब भिंगार परिसरातच वास्तव्यास होता. भिंगारच्या आलमगीर या ठिकाणी औरंगजेबाला शेवटची आंघोळ घालण्यात आली.

Published on: May 13, 2022 09:08 PM