अजित पवार यांच्यामुळेच शिंदे गट नाराज? शिंदे गटाचे आमदार नाराजी ही राहिलच
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खूश असल्याचे जाणवत असतानाच मात्र त्यांच्या सहकाऱ्यांच्यात अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्याने कमालिची नाराजी आहे. यावरून शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली.
मुंबई : राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आणि अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल झाले. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खूश असल्याचे जाणवत असतानाच मात्र त्यांच्या सहकाऱ्यांच्यात अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्याने कमालिची नाराजी आहे. यावरून शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांना पत्रकारांनी राष्ट्रवादीच्या येण्याने शिंदे गट नाराज आहे का? असा सवाल केला. त्यावर उत्तर देताना, गोगावले यांनी नाराज होऊन काय करणार? वस्तुस्थिती ती स्वीकारावी लागेल असे मिश्किल भाष्य केलं. तर अजित पवार यांच्याबाबत थोडीफार नाराजी तर राहणारच असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी नाराजीचं कारण सांगताना, हे मंत्रीमंडळाचा विस्तार असल्याचं सांगत ज्यांनी पुर्ण बाकरी मिळणार होती. ती आता आर्धी आणि ज्यांना आर्धी मिळणार होती त्यांना पाव भाकरी समाधान मानावं लागेल असं म्हटलं आहे. पण राजकीय समीकरण पुढे घेऊन चालायचे असेल तर अशा तडजोडी देखील स्वीकाराव्या लागतात असेही त्यांनी म्हटलं आहे.