…एकदम ओके फेम शहाजी बापू पाटील यांचे संजय राऊतांना खुली ऑफर, म्हणाले, ‘…ते येणार?’
तर आता 1 वर्षांनंतर तो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाल्याचे पहायला मिळत आहे. याचदरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत मी बाजूला होतो असे म्हणत आमदारांना परत येण्याचे आवाहन केलं होतं.
सांगोला : सध्या राजकारणात मोठे राजकीय भूकंप होत आहेत. आधी हा भूंकप उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत झाला. तर आता 1 वर्षांनंतर तो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाल्याचे पहायला मिळत आहे. याचदरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत मी बाजूला होतो असे म्हणत आमदारांना परत येण्याचे आवाहन केलं होतं. त्यांनी, एकनाथ शिंदेंसह 40 आमदारांना आवाहन करतना, तुम्ही म्हणत असाल तर मी बाजूला होता, पण ठाकरेंकडे तुम्ही परत येताय का? असा सवाल शिंदे गटातील नेत्यांना केला होता. त्यावरून सध्यया चर्चा रंगल्या आहेत. यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते सांगोल्याचे आमदार शाहजीबापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी थेट राऊत यांनाच खुली ऑफर दिली आहे. त्यांनी, आमची भूमिका काय संजय राऊत यांच्या एकट्यासाठी निर्माण झाली नव्हती. किंवा त्यांच्या भोवती महाराष्ट्राचं राजकारण फिरत नाही. आम्ही घेतलेली भूमिका ही शिवसेना वाढवण्यासाठी ती वाचवण्यासाठी भूमिका आहे. जर राऊत आमच्या गटात येत असतील, ते काम करत असतील तर त्यांचा कदाचित आमची शिवसेना विचार करेल असं सूचक वक्तव्य शाहजीबापू पाटील यांनी केलं आहे.