Special Report | रिल्स स्टार्सवर राजकीय पक्षांची नजर; मनसे पाठोपाठ जितेंद्र आव्हाड यांचं आवाहन; रिल्स बनवा, 10 लाख जिंका!
तरुणांपर्यंत पोहोचण्याच सर्वात वेगवान माध्यम इंस्टाग्राम आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी देखील इंस्टाग्रामवरच्या रिल्स स्टार्सना जवळ करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
मुंबई, 07 ऑगस्ट, 2023 | तरुणांपर्यंत पोहोचण्याच सर्वात वेगवान माध्यम इंस्टाग्राम आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी देखील इंस्टाग्रामवरच्या रिल्स स्टार्सना जवळ करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. काही दिवसांपूर्वी मनसेने रिल्स स्टार्सचा मेळावा घेतला होता. खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रिल्स स्टार्सशी संवाद साधला. आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील रिर्ल्सची स्पर्धा घेणार असल्याचं म्हटलं आहे. सोशल मीडियावर प्रभावी असणाऱ्या तरुणांमार्फत जनतेपर्यंत पोहोचण्याचा राजकीय पक्षांचा प्रयत्न आता सुरु झाला आहे. त्यामुळे राजकीय पक्षांची नजर सोशल मीडिया स्टार्सवर असल्याची म्हटलं जात आहे.
Published on: Aug 07, 2023 09:45 AM