Ratnagiri | रिफायनरी प्रकल्पात राजकीय ट्विस्ट, काँग्रेसचे रिफायनरीला समर्थन

Ratnagiri | रिफायनरी प्रकल्पात राजकीय ट्विस्ट, काँग्रेसचे रिफायनरीला समर्थन

| Updated on: Jun 30, 2021 | 7:47 PM

राजापूरच्या विकासासाठी आणि राजापूर तालुक्यातून रिफायनरी प्रकल्प बाहेर जावू नये म्हणून बारसू सोलगावं इथं रिफायनरी प्रकल्पासाठी कॉंग्रेसने समर्थन दिलंय. (Political twist in refinery project in ratnagiri, congress support to project)

रत्नागिरी : राजापूर तालुक्यात प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पात आणखी एक राजकीय ट्टिस्ट पहायला मिळतोय. नाणार इथं रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यात आला होता. मात्र आता राजापूरातीलच बारसू सोलगाव एमआयडीसी इथं रिफायनरी प्रकल्पासाठी कॉंग्रेसने समर्थन दिलंय. नाणारमधल्या विरोधानंतर बारसू सोलगाव इथं रिफायनरी कंपनीच्या माध्यमातून जागेची चाचपणी होत असल्याची माहिती पुढे येतेय. त्यामुळे राजापूरच्या विकासासाठी आणि राजापूर तालुक्यातून रिफायनरी प्रकल्प बाहेर जावू नये म्हणून बारसू सोलगावं इथं रिफायनरी प्रकल्पासाठी कॉंग्रेसने समर्थन दिलंय. अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या सदस्या आणि माजी आमदार हुस्नबानू खलीपेनी रिफायनरीसाठी जाहिर समर्थन केलंय.

Chandrakant Patil | अजित पवार, अनिल परबांची CBI चौकशी झाली पाहिजे : चंद्रकांत पाटील
Breaking | राज्य सरकार कर्मचाऱ्यांना थकबाकीचा दुसरा हफ्ता मिळणार