हिवरे बाजार, पाटोदा आणि राळेगणसिध्दी या गावचा आमदार नव्हता म्हणून ती गावं सुधारली; पेरे पाटीलांनी सरकारचे कान का टोचले?
आदर्श सरपंच म्हणून ओळख असणाऱ्या भास्करराव पाटील यांनीच थेट हे वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर राज्यात सध्या एकच चर्चा सुरू आहे.
परळी : राजकारणी लोकांवर विश्वास नसल्याचं विधान भास्करराव पेरे पाटील यांनी केलंय. आत्तापर्यंत महाराष्ट्रात सहा हजार आमदार झाले मात्र सहा गाव देखील चांगली झालेली नाहीत असा घणाघात त्यांनी केला आहे. आदर्श सरपंच म्हणून ओळख असणाऱ्या भास्करराव पाटील यांनीच थेट हे वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर राज्यात सध्या एकच चर्चा सुरू आहे. परळीतील टोकवाडी येथे आदर्श सरपंच पेरे पाटील आणि डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या हस्ते विविध विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी पाटील बोलत होते. या कार्यक्रमा दरम्यान पेरे पाटलांनी राज्य सरकारसह ग्रामस्थांचे देखील कान टोचले आहेत. त्यांनी शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्याला शेती करण्याबरोबरच शेतीमाल उठत नाही याची चिंता आहे. याचं कारण फक्त त्याला शिक्षण नाही. पण यातून आपण मार्ग काढला असता आपल्याला योग्य शिक्षण असत तर. त्यामुळे माझा तर राजकारणांवर भरोसाच नाही आणि आपल्याकडची लईच लोकही राजकारण्यांच्या भरोशावर बसली आहेत. आपल्या महाराष्ट्रात पाटोदा, हिरवे बाजार आणि राळेगणसिद्धी आणखीन एखादा दुसरं गाव ही हाताच्या बोटावर मोजण्यासारखी विकसीत आणि चांगली झाली. राज्याच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत महाराष्ट्रात सहा हजार आमदार झालेत. मात्र सहा गाव देखील चांगली झालेली नाहीत. आणि आम्ही बसलोय त्यांच्या भरोशावर. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी दोन-चार गाव चांगली झाली आहेत. ती आमदारांची गावं नाहीत.