जनतेचे लक्ष दुसरीकडे वेळविणयासाठी हे नाटक सुरू; राज्याच्या राजकारणावर माजी खासदाराची टीका
विरोधी पक्ष विरोधी पक्षासारखा वागत नाही. तर शेतकरी, कष्टकरी, सामान्य लोकांच्या प्रश्नावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वेळविणयासाठी हे नाटक सुरू आहे
कराड (सातारा) : सध्या राज्याचे राजकारण हे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या भोवतीच फिरत आहे. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार, सरकार पडणार ते मुख्यमंत्री होणार तर राज्यात राजकीय भूकंप होणार असाच बातम्या परसत आहेत. आणि त्यावरच चर्चा होत आहे. त्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारसह विरोधी पक्षांवर टीका केली आहे. त्यांनी, विरोधी पक्ष विरोधी पक्षासारखा वागत नाही. तर शेतकरी, कष्टकरी, सामान्य लोकांच्या प्रश्नावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वेळविणयासाठी हे नाटक सुरू आहे. भावनांशी खेळ असून विरोधी पक्ष विरोधी पक्षासारखा वागत नाही, अशी टीका करत जनतेकडे लक्ष द्या अशी मागणी त्यांनी केली आहे.
Published on: Apr 19, 2023 07:42 AM