Education : शिक्षक मतदार संघावरुन राजकारण..! आ.प्रशांत बंब अन् अभिजीत वंजारीमध्ये शाब्दिक चकमक
मतदारसंघ हा बापाचा आहे की काय..? असाच प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. हा मतदार संघ शिक्षकांच्या हक्काचा आहे. त्यामुळे सातबाऱ्यावरील बोजा कमी केल्याच्या गोष्टीएवढे हे सोपे नसल्याचा टोला वंजारी यांनी बंब यांना लगावलेला आहे.
मुंबई : शिक्षकांच्या मुद्द्यावरुन (MLA Prashant Bamb) आ. प्रशांत बंब हे चांगलेच चर्चेत आलेले आहेत. त्यांनी शिक्षकांची वर्तणूक आणि त्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मध्यंतरी याबाबतील एक ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती. यानंतरही बंब हे आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. आता तर त्यांनी थेट (Teacher’s Constituency) शिक्षक मतदारसंघच बंद करण्याची मागणी केली आहे. जे शिक्षक खोटे वागत आहेत, ज्यांच्याकडून बोगस कागदपत्रे तयार केली जात आहेत एवढेच नाही तर जे फौजदारी स्वरुपाची कामे करीत आहेत. अशा शिक्षकांना सपोर्ट करणाऱ्या गोष्टी तर शिक्षक आमदाराला कराव्या लागत असतील तर काय उपयोग असे म्हणत, त्यांनी ही मागणी केली आहे. तर याला (Abhijit Wanjari) अभिजीत वंजारी यांनीदेखील चोख उत्तर दिले आहे. मतदारसंघ हा बापाचा आहे की काय..? असाच प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. हा मतदार संघ शिक्षकांच्या हक्काचा आहे. त्यामुळे सातबाऱ्यावरील बोजा कमी केल्याच्या गोष्टीएवढे हे सोपे नसल्याचा टोला वंजारी यांनी बंब यांना लगावलेला आहे.