Raj Thackeray यांच्या स्वास्थासाठी मनसैनिकांकडून पूजा
राज ठाकरे यांची आज हीप बोन शस्त्रक्रिया होणार आहे. ही शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी यासाठी मनसैनिकांडून प्रार्थना केली जात आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. आज लीलावती रुग्णालयात राज ठाकरे (Raj Thackeray in Lilawati Hospital) यांना ऍडमीट करण्यात येणार आहे. पायाचे दुखणे वाढल्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला होता. त्यांच्या स्वास्थ्यासाठी मनसैनिकांकडून पुजा केली जात आहे. राज ठाकरे यांची आज हीप बोन शस्त्रक्रिया होणार आहे. ही शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी यासाठी मनसैनिकांडून प्रार्थना केली जात आहे. मनसे नेते नितीन सरदेसाई, यशवंत किल्लेदार पुजेवेळी उपस्थित राहणारआहेत.
Published on: Jun 19, 2022 12:55 PM