त्यावेळी माझा बाप माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला, म्हणून पूजा मोरे स्वामिभानीची साथ सोडून शरद पवार यांच्यासोबत
विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या धरतीवर मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण द्यावं लागणार आहे. अन्यथा मराठवाड्यात या पक्षांनी आपला एकही आमदार गृहित धरू नये. मराठा आंदोलनाला विरोध करणाऱ्यांना मराठवाडा पाणी दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा पूजा मोरे यांनी दिला. आम्ही कुणबीचं आहोत. फक्त प्रमाणपत्र नाही. म्हणून जरांगे पाटील यांची मागणी योग्य आहे.
मुंबई, १० सप्टेंबर २०२३ : मराठा आंदोलनाच्या नेतृत्व करणाऱ्या तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला प्रदेश अध्यक्षा पूजा मोरे या शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. पुरोगामी विचारांच्या इंडिया आघाडीला ताकद देणे गरजेचे आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार केला आहे, असं पूजा मोरे यांनी म्हंटलं. आम्ही वेगवेगळ्या पक्षात काम करत असलो, तरी मराठा आंदोलनासाठी सर्व जात, धर्म, पक्ष बाजूला करतो. मनोज जरांगे पाटील यांनी माझ्या गावापासून १७ किलोमीटर अंतरावर उपोषण सुरू केले आहे. उपोषण सुरू होण्याआधी गावोगावी बैठका झाल्या. त्या आम्ही सोबत घेतल्या होत्या. जरांगे पाटील यांची मागणी रास्त आहे. ५० टक्के आरक्षणाची अट सरकारला रद्द करावी लागणार आहे. प्रचंड उत्साहानं आम्ही येथे सहभागी झालो आहोत. शरद पवार यांनी आम्हा सर्वांवर खूप प्रेम केलं. पण, जवळ येऊन साहेबांना बोलता आलं नाही. १९ तारखेला शरद पवार साहेबांचा फोन आला. मला त्यांनी मुंबईला बोलावून घेतलं. शरद पवार यांना भाषण करताना सुप्रिया सुळे यांच्या डोळ्यात अश्रृ पाहिले. तेव्हा माझा बाप माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. त्यामुळे शरद पवार यांना ताकद देण्यासाठी आम्ही आलो असल्याचं पूजा मोरे यांनी सांगितलं.