काँग्रेसकडून एक अर्ज मागे घेतल्या जाण्याची शक्यता!
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी (legislative assembly election) अर्ज मागे घेण्याची वेळ फक्त 3 वाजेपर्यंतचीच होती, मात्र शेवटच्या क्षणी काँग्रेसकडून 1 अर्ज मागे घेण्यात येणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सह्यांद्री अतिथी गृहावर बैठक घेण्यात येत आहे. हायकमांडकडून सूचना आल्यास निवडणुकीसाठी दाखल केलेला अर्ज मागे घेण्याची तयारी काँग्रेसने दाखविली होती. शिवसेना आणि राष्ट्रवादीने काँग्रेसकडून एक अर्ज […]
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी (legislative assembly election) अर्ज मागे घेण्याची वेळ फक्त 3 वाजेपर्यंतचीच होती, मात्र शेवटच्या क्षणी काँग्रेसकडून 1 अर्ज मागे घेण्यात येणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सह्यांद्री अतिथी गृहावर बैठक घेण्यात येत आहे. हायकमांडकडून सूचना आल्यास निवडणुकीसाठी दाखल केलेला अर्ज मागे घेण्याची तयारी काँग्रेसने दाखविली होती. शिवसेना आणि राष्ट्रवादीने काँग्रेसकडून एक अर्ज मागे घ्यावा अशी भूमिका मांडली होती. यावर काँग्रेसकडून एक अर्ज मागे घेतला जाणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. चंद्रकांत हंडोरे यांचा अर्ज मागे घेतल्या जाऊ शकतो. भाई जगताप मात्र आपल्या अर्जावर ठाम आहेत. त्यामुळे काँग्रेसकडून एक अर्ज मागे घेतला जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे भाजपाकडूनही ही निवडणूक बिनविरोध कण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसने अर्ज मागे घ्यावा अशी मागणी भाजपाने केल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांची बैठक सुरू असल्याची माहिती आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक सह्यांद्री अतिथी गृहावर घेण्यात येत असल्याचे समजते.