Shivsena Poster In Ayodhya | असली आ रहा है, नकली से सावधान! अयोध्या दौऱ्याआधी शिवसेनेची बॅनरबाजी

| Updated on: May 08, 2022 | 9:22 AM

भोंग्यांच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर ५ जूनला अयोध्या वारी करणार असल्याचे जाहीर केले आहे, त्यांच्यानंतर शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या वारी जाहीर करण्यात आली, त्याची तारीख मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात ठरवण्यात आली आहे.

Shivsena Poster In Ayodhya: अयोध्या- मुंबई – ‘असली आ रहा है, नकली से सावधान‘ अशा स्वरुपाचे पोस्टर्स, होर्डिंग्ज सध्या अयोध्येत चर्चेचा विषय ठरले आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्यापूर्वी शिवसैनिकांतर्फे असे पोस्टर्स थेट अयोध्येत लावण्यात आले आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आदित्य ठाकरे हे अयोध्येचा (Ayodhya) दौरा करणार आहेत. तर त्यांच्यानंतर 5 जूनला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) हेही अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. भोंग्यांच्या मुद्द्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला दिलेल्या आव्हानानंतर, आता अयोध्येत असली आणि नकलीचे पोस्टर्स शिवसेनेकडून लावण्यात आले आहेत. यानिमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टार्गेट करण्याचा शिवसेना प्रयत्न आहे.

Published on: May 08, 2022 09:22 AM
Special Report | MVA एकत्र लढली, तर जागांचा पेच कसा सुटेल?
Pune Vasant More On Hanuman Mahaarti | मनसेच्या पार्टटाईम पदाधिकाऱ्यांना माझं वेगळेपण खटकतं