दक्षिण मुंबईतील बत्तीगुल, रेल्वेचा खोळंबा

| Updated on: Feb 27, 2022 | 12:38 PM

टाटा ग्रीड फेल्यूअर (Tata Grid failure) झाल्याने दक्षिण मुंबईत (south Mumbai) वीज पुरवठा (Power outage) खंडित झाला.

मुंबई: टाटा ग्रीड फेल्यूअर (Tata Grid failure) झाल्याने दक्षिण मुंबईत (south Mumbai) वीज पुरवठा (Power outage) खंडित झाला. कुलाबापासून ते कुर्ल्यापर्यंत आणि चर्चगेटपासून ते विरारपर्यंत वीज पुरवठा अचानक खंडित झाल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. बत्तीगुल झाल्यामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनसही अंधारात गेले होते. वीज पुरठा खंडित होण्याचा सर्वाधिक फटका फोर्ट परिसर, दादर, माटुंगा, भायखळा, शीव, परळ, वरळी आणि प्रभादेवी परिसराला बसला होता. त्यामुळे अनेकांनी बेस्ट प्रशासनाच्या कार्यालयात फोन करून वीज पुरवठा खंडित झाल्याबाबतच्या तक्रारी करतानाच हा पुरवठा कधी सुरू होणार अशी विचारणाही केली. तसेच वीज नसल्याने मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेचाही खोळंबा झाला. मात्र, आज रविवारचा दिवस असल्याने चाकरमान्यांची गैरसोय झाली नाही. तब्बल तासाभराच्या खोळंब्यानंतर वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला. त्यामुळे दक्षिण मुंबईतील रहिवाश्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

शिरोळ जिल्हाधिकारी कार्यालयातच शेतकऱ्याने साप सोडला
Nanded | 8 वर्षाच्या बाल कीर्तनकाराच्या कीर्तनाला नागरिकांची मोठी गर्दी