Special Report | आदित्य ठाकरे यांचा गौप्यस्फोट; बंडखोरीआधी ‘मातोश्री’वर काय घडलं होतं.

| Updated on: Apr 14, 2023 | 8:48 AM

आदित्य ठाकरे यांनी शिंदे हे मातोश्रीवर येऊन रडले. त्याचबरोबर आपण भाजप सोबत गेलो नाहीतर ते आपल्याला जेलमध्ये टाकतील असं म्हटल्याचा दावा केला. त्यानंतर आता शिंदे गटाकडून आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली जात आहे

मुंबई : सत्ता संघर्षाचा (Power struggle) निकाल कधीही येण्याची शक्यता आहे. त्याच्याआधीच राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील नेते एकमेंकांच्या समोर आले आहेत. कारण आहेत फक्त आदित्य ठाकरे यांनी केलेला गौप्यस्फोट. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे हे मातोश्रीवर येऊन रडले. त्याचबरोबर आपण भाजप सोबत गेलो नाहीतर ते आपल्याला जेलमध्ये टाकतील असं म्हटल्याचा दावा केला. त्यानंतर आता शिंदे गटाकडून आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. त्यांना कोणी पुड्या सोडणारा तर नारायण राणे यांनी बालिश असं म्हटलं आहे. तर खुद्द शिंदे यांनी आदित्य ठाकरे हे अजून लहान असल्याचे म्हणत टीका केली आहे. तर आदित्य ठाकरे यांच्या या दाव्यावर खासदार संजय राऊत, खासदार सुप्रिया सुळे यांनी देखिल मान हालविल्याने शिंदे गटाने पलटवार करण्यास सुरूवात केली आहे.

Published on: Apr 14, 2023 08:48 AM
नितीन गडकरी यांना धमकी देणाऱ्या जयेश पुजारी यांच्या संदर्भात नवा मोठा खुलासा 
कोणाच्यातरी ऑर्डरवर चालायला मला जमत नाही, महादेव जानकर यांनी स्पष्टच सांगितलं