Supreme Court | सत्तासंघर्षाची याचिका आज सुप्रीम कोर्टात मेन्शन- tv9
भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाने राज्याने सत्ता काबीज केली आहे. त्यानंतर राज्यातील सत्तासंघर्षाचा वाद हा सर्वोच्च न्यायालयात गेला.
मुंबई : भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाने राज्याने सत्ता काबीज केली आहे. त्यानंतर राज्यातील सत्तासंघर्षाचा वाद हा सर्वोच्च न्यायालयात गेला. आता पर्यंत या विषयी तीन वेळा न्यायालयात सुनावणी पार पडली असून यावर पुढील सुनावणी 22 ऑगस्टला होणार आहे. जी 12 ऑगस्टला होणार होती. दरम्यान राज्यातील खरी शिवसेना कोणाची असा प्रश्न उठलेला असताना शिंदे गटाने आम्हीच खरी शिवसेना असे म्हटलं होतं त्यानंतर निवडणूक आयोगाने यावर शिवसेनेकडे उत्तर मागितले होते. तर यावर शिवसेने एका महिन्याचा वेळ मागितला होता. मात्र निवडणूक आयोगाकडून याप्रकरणी 19 ऑगस्टला निर्णय देणार आहे. तर याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आजच सत्तासंघर्षाची याचिका मेन्शन झाली आहे. तर आम्ही अजून कुठलाही निर्णय दिला नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे होणारी सुनावणी आणि निवडणूक आयोगाचा येणारा निर्णय शिंदे गट आणि शिवसेनेसाठी महत्वाचा असणार आहे.