Nitin Gadkari : हेलिकॉप्टरमधून फिरणारे गडकरी चक्क सायकलच्या दुकानात? पहा काय आहे प्रकरण

| Updated on: May 07, 2023 | 12:18 PM

सध्या गडकरी यांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यात ते एका सायकलच्या दुकानात बसले असल्याचे दिसत आहे. त्यामुळे याची चर्चा चांगलीच रंगली आहे.

नागपूर : राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल हा 11 तारखेनंतर येण्ययाची शक्याता आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींचे समिकरणं बदलली आहेत. त्यातच कर्नाटक निवडणुकींचे (Karnataka elections) पडघम वाजले असून सध्या प्रचाराला जोर आला आहे. भाजपसह काँग्रसचे अनेक बडे नेते हे कर्नाटकमध्ये तळ ठोकून आहेत. यामध्ये महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्टारप्रचाकर म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यामुळे गडकरी आणि फडणवीस हे कर्नाटकातच आहेत. मात्र सध्या गडकरी यांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यात ते एका सायकलच्या दुकानात बसले असल्याचे दिसत आहे. त्यामुळे याची चर्चा चांगलीच रंगली आहे. मात्र रंक असो की राजा त्याला नातवंडांच्या हट्टासाठी घोडा व्हावं लागतं. नाहीतर त्यांचे हट्ट पुरवण्यासाठी मी पणा सोडावा लागतो. असचं काही गडकरी यांच्याबरोबर झालं. गडकरी यांची दोन वर्षीय नात कावेरीच्या वाढदिवसाची तयारी सुरू होती. तर तिला काय हवं हे चाचपलं जात होतं. त्यामुळे ते त्यांच्या पत्नी कांचन गडकरी व इतर नातवंडांचा गोतावळा घेऊन काय घ्यायचं म्हणून बाहेर पडले ते पोहचले चक्क सीताबर्डी येथील एका सायकलच्या दुकानात (cycle shop) . जो पर्यंत आपल्या नातवंडांची फर्माईश पूर्ण होत नाही तो पर्यंत आजोबा दुकानात बसून होते. तर ते नातवंडं खरेदी करण्यात दंग असताना ते बघण्यात गडकरी रमलेले बघायला मिळाले.

Published on: May 07, 2023 12:02 PM
मालेगावात पाणी टंचाईच्या झळा, ‘या’ गावातील ग्रामस्थांची टँकरखाली ओंजळ
‘मी फडणवीसांच्या जागी असतो तर उपमुख्यमंत्री पद घेतलचं नसतं’, कुणी लगावला टोला