कावळा कोकिळावर नवनीत राणांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…
आताची शिवसेना ही बहुरूपीय कोकिळा आहे. ओरिजनल कोकिळा नाहीच. ओरिजनल कोकिळा ही एकनाथ शिंदेजीन सोबत आहे
नवी दिल्ली : राज्याच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पुर्ण झाली. फक्त निकाल येणे बाकी आहे. त्याच्याआधी उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी कावळा कोकिळा याचं उदाहरण देत शिवसेना ही आमचीच आणि तसा निकाल ही येणार असल्याचा दावा केला होता. त्यावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली.
यावेळी राणा यांनी, जेव्हा बाळासाहेबांचे विचार घेऊन शिवसेना बोलत होती ती खरी कोकिळा होती. आता ठाकरे यांच्याकडे आहे ती नाही. आताची शिवसेना ही बहुरूपीय कोकिळा आहे. ओरिजनल कोकिळा नाहीच. ओरिजनल कोकिळा ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत आहे. 40 आमदार हे एकनाथ शिंदेंबरोबर आहेत. ते ओरिजनल कोकिळासोबत आहेत. त्यामुळे खरी कोकिळा कोणाची हे माहाराष्ट्राने पाहिलेलं आहे.
ठाकरे हे पळून गेले. ते घाबरले. बाहेर काढणे आणि स्वत: जाणे या वेगवेगळ्या बाबी आहेत, असेही नवणीत राणा म्हणाल्या. तसेच राणा यांनी, यावेळी तहकूब होणाऱ्या संसदीय अधिवेशनावर ही नाराजी व्यक्त केली. तसेच हे विरोधकांच्यामुळे होत असल्याचा आरोप देखिल केला. विरोधक हे त्यांच्या पार्टीला मजबूत करण्यासाठी सभागृहामध्ये गोंधळ घालतात. सभागृह बंद पडल्याने लाखो रूपयांचे नुकसान होत आहे. हा सामान्यांवर होणारा अन्याय आहे. तसाच आमच्या सारख्या नवख्यांवर आहे असेही त्या म्हणाल्या.