भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीत अशोक चव्हाण यांचाही समावेश; कोणी केली इच्छा व्यक्त?
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून काँग्रेसनेही जिल्हावार आढावा बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत गुरुवारी हिंगोलीत काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली.
हिंगोली- आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून काँग्रेसनेही जिल्हावार आढावा बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत गुरुवारी हिंगोलीत काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांनी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पाहायचं आहे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आता भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीत आणखी एका नेत्यांच्या नावाची नोंद झाली आहे.
Published on: Jun 22, 2023 05:21 PM