शिक्षक, पदविधर मतदाससंघ निवडणूकीत बच्चू कडूंची उडी, शिंदे -फडणवीसांविरोधात लढणार निवडणूक
प्रहार पक्षाचे नेते आणि आमदार बच्चू कडू हे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूकीत शिंदे -फडणवीसांविरोधात लढणार असल्याचे म्हटलं आहे. तसेच या निवडणुकीसाठी प्रहार पक्षाकडून ५ उमेदवारही देण्यात येतील असंही त्यांनी घोषीत केलं.
अमरावती : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली. त्यानंतर यात कोण कोण असणार कोण उकरणार याकडे राज्याचे लक्ष लागूण राहिले आहे. याचदरम्यान राज्याच्या सत्तांतरणावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बरोबर असणाऱ्या बच्चू कडूंनी विरोधी भूमिका घेतली आहे.
प्रहार पक्षाचे नेते आणि आमदार बच्चू कडू हे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूकीत शिंदे -फडणवीसांविरोधात लढणार असल्याचे म्हटलं आहे. तसेच या निवडणुकीसाठी प्रहार पक्षाकडून ५ उमेदवारही देण्यात येतील असंही त्यांनी घोषीत केलं.
तसेच कडू यांनी यावेळी सांगितलं की, आगामी 30 जानेवारीला होणाऱ्या विधान परिषदेतील पाच जागेच्या निवडणूकीसाठी प्रहार जनशक्ती पक्ष मैदानात उतरणार आहे. तसेच या निवडणुकीसाठी प्रहार पक्षाकडून ५ उमेदवारही देण्यात येतील. नाशिक, अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघाची देखील निवडणूक जाहीर झाली आहे.