Video : संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप

| Updated on: Mar 29, 2024 | 5:01 PM

संजय राऊत हे महाविकास आघाडीत बिघाडी करण्याचे काम करीत असल्याचा थेट आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तर प्रकाश आंबेडकर यांनी आजही महाविकास आघाडीत यावे अशी ऑफर शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या बरोबरची चर्चा निष्फळ ठरली आहे. त्यामुळे इतक्या दिवसांच्या चर्चेतून काही फायदा झालेला नाही. आम्ही वंचित बहुजन आघाडीला पाच जागांची ऑफर दिली होती असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर आमच्याकडे केवळ तीन जागांचा प्रस्ताव आला होता असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. एक जागा आमची पारंपारिक अकोला आणि दोन इतर जागा असे आंबेडकर यांनी म्हटले आहे. मविआ आणि संजय राऊत हे वेग- वेगळे आहेत. संजय राऊत महाविकास आघाडीत बिघाडी करीत आहेत असा थेट आरोप प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. तर आम्ही आजही आंबेडकरांनी आमच्यासोबत रहावे अशी मागणी करीत असल्याचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Published on: Mar 29, 2024 05:00 PM
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले शरद पवार
आगे आगे देखो…, अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?