“कोण हा किरीट सोमय्या?” प्रकाश आंबेडकर पत्रकारावर भडकले; म्हणाले, “दिगंबर साधूंचा…”
भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
अहमदनगर, 19 जुलै 2023 | भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने हा व्हिडीओ प्रसारीत केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, “कोण किरीट सोमय्या? कोणाचंही नाव घ्यायचं आणि तुमचा टीआरपी वाढवायचा, असं सगळं सुरू आहे. रस्त्यावर दिगंबर साधू फिरतात ना, त्यांचे हवे तितके फोटो काढा आणि दाखवा तुमच्या टीव्हीवर, टीआरपीसाठी.”
Published on: Jul 19, 2023 09:02 AM