प्रकाश आंबेडकर यांचा मोठा गौप्यस्फोट, ‘कोरेगाव भीमा दंगल घडवली.. त्यावेळी देवेंद्र फडणवीस…’
कोरेगाव भीमा आयोगासमोर प्रकाश आंबेडकर यांची महत्वाची साक्ष नोंदविण्यात आली. या साक्षीनंतर पत्रकारांशी बोलताना आंबेडकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना काही प्रश्न केले. तर, एक मोठा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला.
पुणे : 30 ऑगस्ट 2023 | कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी नेमण्यात आलेल्या आयोगासमोर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची साक्ष नोंदवण्यात आली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला. 1 जानेवारीला ही दंगल घडली. मुख्य म्हणजे ही दंगल घडली नाही तर घडविण्यात आली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे नगरमध्ये होते. त्यांचे हेलिकॉप्टर इथून किती वाजता टेक ऑफ झाले याची नोंद आहे. त्यामुळे पोलिसांना जे इनपुट मिळाले ते मुख्यमंत्री यांच्यापर्यंत गेले का? त्यांना दंगली संदर्भात माहिती मिळाली नाही का? मिळालेली माहिती त्यांनी दाबून का ठेवली? असे सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केले आहेत.
Published on: Aug 30, 2023 08:25 PM