प्रकाश आंबेडकर यांचं मोठं विधान; “…म्हणून मी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली!”
काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर औरंजेबाच्या कबरीजवळ नतमस्तक झाले. त्यांच्या या कृतीमुळे शिवसेना आणि भाजपने त्यांच्यावर सडकून टीका केली. तसेच उद्धव ठाकरे यांची भूमिका काय हे स्पष्ट करण्यास सांगितले. संभाजीराजे छत्रपती यांनी देखील प्रकाश आंबेडकर यांना चांगलंच फटकारलं आहे. याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर औरंजेबाच्या कबरीजवळ नतमस्तक झाले. त्यांच्या या कृतीमुळे शिवसेना आणि भाजपने त्यांच्यावर सडकून टीका केली. तसेच उद्धव ठाकरे यांची भूमिका काय हे स्पष्ट करण्यास सांगितले. संभाजीराजे छत्रपती यांनी देखील प्रकाश आंबेडकर यांना चांगलंच फटकारलं आहे. याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आपण औरंगजेबाच्या समाधीस्थळी जावून भेट दिली. त्यामुळे महाराष्ट्रातील दंगली थांबवण्यात आपल्याला यश आलं असं खळबळजनक विधान आंबेडकर यांनी केलं आहे. मी औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिली, माझ्या निर्णयामुळे राज्यातील दंगली थांबल्या, असं मोठं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
Published on: Jun 27, 2023 08:33 AM