PRAKASH AMBEDKAR : उद्धव ठाकरेंना फसवणारे ते कोण? प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टच सांगितले

| Updated on: Jan 12, 2023 | 1:06 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी घेतलेल्या भेटीनंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर यांनी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीत एकत्र राहू नये असे धक्कादायक विधान केले आहे.

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस (CONGRESS) , राष्ट्रवादीसोबत (NCP)  जात महाविकास आघाडी स्थापन केली. त्या महाविकास आघाडीतून ( MAHAVIKAS AGHADI ) बाहेर पडण्याचा सल्ला वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर ( PRAKASH AMBEDKAR ) यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM EKNATH SHINDE )यांच्या भेटीनंतर लगेचच त्यांनी हे विधान केल्याने राजकीय चर्चा सुरु झाली आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांची काल रात्री भेट घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकर शिंदे गटात सामील होणार अशी चर्चा सुरु झाली. मात्र, त्या चर्चाना आंबेडकर यांनी पूर्णविराम दिलाय. उद्धव ठाकरे आणि आमच्या युतीत बदल नाही. भाजप किंवा भाजसोबत असलेल्या कुणाशीही आम्ही युती करणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी आगामी निवडणूक शिवसेनेसोबत एकत्र लढण्याबाबत आमचे एकमत आहे. तसे जाहीर करणे बाकी आहे. या भूमिकेत कोणतही बदल नाही. पण, शरद पवार आणि काँग्रेसला माझ्याइतका जवळून ओळखणारा महाराष्ट्रातला दुसरा नेता नाही. ते तुम्हाला फसवतील. त्यामुळे शिवसेनेने काँग्रेससोबत जाऊ नये, असा सल्ला त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

Published on: Jan 12, 2023 01:06 PM
अमोल मिटकरी किरीट सोमय्यांवर बरसले, म्हणाले तोतरी जबान…
DEVENDRA FADNAVIS : देवेंद्र फडणवीस यांचा पक्षपातीपणा, माझं वाचन कमी.. का म्हणाल्या असं सुप्रिया सुळे