प्रकाश आंबेडकर यांची या नेत्यावर टीका, म्हणाले ‘सावध व्हा, पोरगी चप्पल घालताना…’
काँग्रेसवाल्यांना सांगतो, राहुल गांधी यांना निर्णय घ्यायला शिकवा. त्यांच्यात क्षमता निर्माण करा. निर्णय करण्याची ताकद नसेल तर ते देशाचे नेतृत्व कसे करणार? निर्णय घेण्याचे क्षमता नसेल तर मोदीसारखा चालाख माणूस त्यांना बदनाम करत राहील.
मुंबई : 2 ऑक्टोबर 2023 | किल्लारी भुकंपावेळी शरद पवार येऊन गेले. आम्ही पण डोळ्याने तो भूकंप पाहिला. लातुरच्या विद्यार्थ्यांनी त्यावेळी मदत केली. जेवढ्याना मेडिकलची गरज होती ती दिली. त्यावेळी चादरिला स्ट्रेचर केले. शरद पवार हे विसरलात का? तुमचे स्वागत का झाले नाही? लालू यादव याच्यासारखं धाडस पाहिजे. जेलच्या भीतीने हे हिम्मत हरतात. निवडणूका होईपर्यंत काय होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे सावध व्हा. आता मार्केटिंगचा जमाना सुरू झाला आहे. कुणाचा पेहरावदेखील वादात अडकत आहे. आपण असताना आई बापाचे काम करतोच त्याला नाही म्हणत नाही. पण, पोरगी चप्पल घालताना मार्केटिंग झालं. इथे लोकांचे प्रश्न सोडवण्याचा जमाना नाही अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचे नाव न घेता केली.
Published on: Oct 02, 2023 10:14 PM