‘‘गोरमेंट आंटी’ अगदी बरोबर बोलली, तुम्ही पक्षफुटीचा स्टंट करून’; प्रकाश आंबेडकर यांचे शरद पवार यांच्यावर टीकास्र
पंतप्रधान मोदी यांना शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात देखील आला. त्यानंतर आता शरद पवार यांच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे. यावरूनच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांवर बोचरी टीका केली आहे.
पुणे, 03 ऑगस्ट 2023 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यावरून तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जाण्यावरून अनेकांनी विरोध दर्शवला आहे. त्यानंतर हा पुरस्कार सोहळा पुण्यात पार पडला. पंतप्रधान मोदी यांना शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात देखील आला. त्यानंतर आता शरद पवार यांच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे. यावरूनच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांवर बोचरी टीका केली आहे. त्यांनी शरद पवार यांनी डिवचताना एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी एक मीम शेअर करत पवारांवर टीका केली आहे. ज्यात त्यांनी, “जेव्हा तुम्ही गोष्टींकडे दुसऱ्या दृष्टीकोनातून पाहता, त्यावेळी गॉरमिंट आंटी बरोबरच बोलते हे तुमच्या लक्षात येतं. द्वेष, जातीभेद आणि मृत्यूच्या व्यापाऱ्यांच्या (भाजप) बाजूने तुम्हाला (शरद पवार) जायचं असेल, तर तुम्ही जा. या तुमच्या पक्ष फुटीच्या राजकारणाने महाराष्ट्राच्या आणि भारताच्या लोकांना मूर्ख बनवू नका अशी टीका केलीय. पवार यांनी नेहमीच दुतोंडी भूमिका घतली आहे. तर ते लग्न एकाशी करतात आणि संसार दुसऱ्याबरोबर थाटतात असा घणाघात केला आहे.