प्रकाश आंबेडकर कोणत्या पदाधिकारीसाठी उतरले मैदानात? ॲट्रोसिटी दाखल करण्याची मागणी का केली?

| Updated on: Jun 04, 2023 | 10:57 AM

याप्रकरणी या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ज्याचा मृत्यू झाला त्याचे नाव अक्षय भालेराव असे आहे. त्यावरून आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत दोषींवर ॲट्रोसिटी दाखल करण्याची मागणी केली आहे.

नांदेड : येथे वरातीत नाचण्याच्या कारणावरून दोन गटात गुरुवारी रात्री हाणामारी झाल्याची घटना घडली. नांदेड शहरालगत असलेल्या बोंडार गावात ही घटना घडली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून 7 जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ज्याचा मृत्यू झाला त्याचे नाव अक्षय भालेराव असे आहे. त्यावरून आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत दोषींवर ॲट्रोसिटी दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच हत्येचा कट यासकट इतर कलमान्वये कठोर कारवाई तसेच दोषींची मालमत्ता जप्त करण्यात यावी अशीही त्यांनी मागणी केली आहे. तर अक्षय हा वंचित बहुजन आघाडीचा पदाधिकारी होता. भालेराव कुटुंबासोबत आणि बोंढार येथील आंबेडकरी समुहासोबत आम्ही ठामपणे उभे आहोत! असे त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर बोंडार गावातील अक्षय भालेराव या तरुणाचा जातीयवादी सनातनी विचारांच्या गुंडांनी केलेला खून महाराष्ट्राच्या पुरोगामी मुखवट्यावर काळीमा फासणारा असल्याचेही ते म्हणाले.

Published on: Jun 04, 2023 10:57 AM
VIDEO | ही बातमी वाचाच! घराबाहेर पडण्याआधी हवामान विभागाचा ‘हा’ अलर्ट पहाच
प्रकाश आंबेडकर यांच्या ‘त्या’ विधानावर अजित पवार म्हणतात, “आमच्या पक्षाबद्दल…”