“पाटण्यात विरोधीपक्ष एकत्र आल्याने पंतप्रधान मोदी यांना धडकी भरली”, प्रकाश आंबेडकर यांची टीका

| Updated on: Jun 27, 2023 | 4:22 PM

काही दिवसांपूर्वी बिहारच्या पाटण्यात देशातील विरोधी पक्षांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी उपस्थिती दर्शवली. यात महाराष्ट्राचे शरद पवार, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे आदी नेत्यांचा समावेश होता. याच पार्श्वभूमीवर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सूचक विधान केलं आहे.

पुणे: काही दिवसांपूर्वी बिहारच्या पाटण्यात देशातील विरोधी पक्षांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी उपस्थिती दर्शवली. यात महाराष्ट्राचे शरद पवार, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे आदी नेत्यांचा समावेश होता. याच पार्श्वभूमीवर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सूचक विधान केलं आहे. “पाटण्यात जमलेले विरोधक एकत्र राहतील की, नाही माहिती नाही. मात्र 15 पक्ष एकत्र आल्याने भाजपला धडकी भरली आहे. कर्नाटक गेल्यानंतर इतर राज्यातही भाजपचा पराभव होऊ शकतो, त्यामुळे चार राज्याच्या निवडणुकांआधी मोदी लोकसभा निवडणुका घेणार,” असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

 

Published on: Jun 27, 2023 04:22 PM
“शरद पवार भावी पंतप्रधान होण्यासाठी बिहारला गेले, मात्र….”, भाजप नेत्याचा हल्लाबोल
“उद्धव ठाकरे यांची नार्को टेस्ट व्हावी”, कोणी केली मागणी?