“मविआत बापात बाप नाही, लेकात लेक नाही अशी परिस्थिती”, कुणी केली टीका?
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कुर्ल्यामध्ये झालेल्या भाषणात मविआवर टीका केली आहे.आज आपल्याला दाखवला जात आहे, तशी परिस्थिती वेगळी आहे. महाविकास आघाडीनं आम्हाला बाहेर ठेवावतं पण स्वत:चं जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवा ना.महाविकास आघाडीत बापात बाप नाही लेकात लेक नाही अशी परिस्थितीती आहे".
मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कुर्ल्यामध्ये झालेल्या भाषणात मविआवर टीका केली आहे.”भाजपच्या कटपुतली नाचवण्यावर इतरांच्या युती अवलंबून आहेत. आज जे राजकारण सुरु आहे, त्यात मला नाही वाटत मविआ एकत्र राहिल. कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्यांच्यात भांडणं होणार”, असं आंबेडकर म्हणाले. “आज आपल्याला दाखवलं जातं तशी परिस्थिती वेगळी आहे. महाविकास आघाडीनं आम्हाला बाहेर ठेवावतं पण स्वत:चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवावा.महाविकास आघाडीत बापात बाप नाही लेकात लेक नाही अशी परिस्थिती आहे”, असं देखील प्रकाश आंबेकर म्हणाले. तसेच “नव्या संसंदेचं उद्घाटन झाले तर दुसरीकडे खेळाडूचे शोषण होत आहे.पंतप्रधान नरेद्र मोदींचा आम्ही निषेध करतो. देशाचा गौरव आंतराष्ट्रीय स्तरावर केलेला आहे, त्या खेळाडूचं म्हणण तुम्ही ऐकू शकत नाही. तर आज तुम्ही सामान्य माणसाचं काय ऐकणार?”, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केली आहे.