ठाकरेगट आणि वंचितची युती, पण आम्ही मविआचा भाग नाही-प्रकाश आंबेडकर

| Updated on: Jan 31, 2023 | 7:49 AM

वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना ठाकरे गट आणि वंचितच्या युतीवर भाष्य केलंय. पाहा ते काय म्हणालेत...

वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना ठाकरे गट आणि वंचितच्या युतीवर भाष्य केलंय. आमची आणि शिवसेनेच्या ठाकरेगटाची युती झालेली आहे.पण अद्याप आम्ही महाविकास आघाडीचा भाग नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने अद्याप उद्धव ठाकरेंकडे तसा निरोप दिलेला नाही. तसा निरोप माझ्यापर्यंतही आलेला नाही. त्यामुळे आम्ही अजूनतरी महाविकास आघाडीचा भाग नाही. ठाकरे गटाशी मात्र आमची युती झालेली आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

कसबा, चिंचवडबाबत मनसेची भूमिका काय? यासह जाणून घ्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
पिंपरी चिंचवडमधील जुन्या टायरच्या गोडाऊनला मोठी आग, पाहा व्हीडिओ…