‘कोण महाविकास आघाडी? मविआसोबत देणे घेणे नाही’; आंबेडकर यांचे मोठे विधान

| Updated on: Aug 10, 2023 | 1:45 PM

राज्यात देखील आगामी लोकसभा आणि महापालिकांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमिवर पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. सर्वच पक्ष बैठका, सभा घेताना दिसत आहेत. याचदरम्यान महाविकास आघाडी देखील आता मोर्चेबांधणीला लागली असून शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठका होत आहेत.

औरंगाबाद, 10 ऑगस्ट 2023 | राज्यासह देशातील काही राज्यात सध्या आगामी निवडणूकांवरून सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. राज्यात देखील आगामी लोकसभा आणि महापालिकांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमिवर पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. सर्वच पक्ष बैठका, सभा घेताना दिसत आहेत. याचदरम्यान महाविकास आघाडी देखील आता मोर्चेबांधणीला लागली असून शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठका होत आहेत. तर मविआतील शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीचा शरद पवार यांचा गट हे केंद्रात इंडिया आघाडीत गेले आहेत. तर राज्यात वंचित बहुजन आघाडीने ठाकरे गटाच्या शिवसेनेशी युती केली आहे. त्यांचा मविआत जाण्यास विरोध असल्याचे कळत आहे. याचदरम्यान आता प्रकाश आंबेडकर यांचे मोठे विधान समोर येत असून त्यांनी थेट महाविकास आघाडीसोबत आमचे काहीही देणे घेणे त्यांच्या सोबत आपला काहीच संबंध नाही, असे म्हटलं आहे. तर आमची शिवसेनेसोबत युती आहे. आमचा समझोता शिवसेनेसोबत होईल. महाविकास आघाडी कोण हे पाहण्याची आम्हाला गरज नाही असे म्हटलं आहे. त्यामुळे येत्या काळात मविआच्या समोर शिंदे गट, अजित पवार गट, भाजपसह आता वंचितचे देखील आव्हान समोर असणार आहे.

Published on: Aug 10, 2023 01:38 PM
‘राजू शेट्टी शेपटीला चिंध्या बांधून कार्यकर्त्यांना जाळतायत’; शेट्टी यांच्यावर शेतकरी नेत्याची बोचरी टीका
Lok Sabha Elections : देशात मध्यावधी? निवडणुका महिना-दीड महिन्यात होतील? आंबेडकर यांचा दावा