Prakash Ambedkar | वंचित बहुजन आघाडी मविआसोबत युती करण्यास तयार : प्रकाश आंबेडकर
आंबेडकर यांनी, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि आपल्यातच युतीबाबत बोलणी सुरू असल्याचेही म्हटलं आहे. तर येत्या महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र लढणार असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे
मुंबई : मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युतीसंदर्भात चर्चा होत होती आणि त्यानंतर त्यांच्यात सहमती ही झाली. त्यानंतर पुढे काय होणार? उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती झाली. मात्र वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती होणार का? असा प्रश्न तयार झाला होता.
पण आता हा ही प्रश्न सुटला आहे. वंचित बहुजन आघाडी मविआसोबत युती करण्यास तयार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलं आहे.
त्याचबरोबर युतीबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले, आमच्या युतीसाठी काँग्रेसचा छुपा आणि राष्ट्रवादीचा थेट विरोध असल्याचा दावा देखिल आंबेडकर यांनी केला.
त्याचबरोबर आंबेडकर यांनी, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि आपल्यातच युतीबाबत बोलणी सुरू असल्याचेही म्हटलं आहे. तर येत्या महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र लढणार असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे