‘जरांगेंचे आंदोलन जर यशस्वी झाले तर…,’ प्रकाश आंबेडकर यांनी काय दिला इशारा

| Updated on: Feb 18, 2024 | 7:16 PM

साल 1950 ते 2013 देशातून 7,200 हिंदू व्यक्ती नागरिकत्व सोडून परदेशात गेल्या होत्या, तर साल 2014 ते आजच्या तारखेपर्यंत 24 लाख हिंदू कुटुंबे देश सोडून त्यांनी परदेशी नागरिकत्व स्वीकारले आहे. त्या कुटुंबांची मालमत्ता किमान 50 कोटी इतकी असेल. हा सर्व वर्ग संत परंपरेला मानणारा होता. संपत्ती आणि वैचारिक बैठक दोन्ही असल्याने आपल्याला विरोध होऊ शकतो म्हणून हे हिंदू लोक देश सोडून गेले असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे..

वर्धा | 18 फेब्रुवारी 2024 : मराठा समाजाला आरक्षण मिळावे परंतू त्यांच्यासाठी वेगळे ताट असावे आणि ओबीसीला वेगळे ताट असावे, तरच महाराष्ट्रात शांतता नांदेल. आता 20 आणि 21 तारखेला दोन दिवसाचे विशेष अधिवेशन आहे त्यात याबाबत योग्य तो निर्णय होईल अशी आशा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन जर यशस्वी झाले तर महाराष्ट्रात मोठी राजकीय उलाथा पालथ होईल. त्यामुळे त्यांचे आंदोलन यशस्वी होऊ नये असा प्रयत्न देखील होऊ शकतो. महाराष्ट्रात अनेक महत्वाच्या व्यक्तींचा अपघातात मृत्यू झालेला आहे. म्हणूनच आपण जरांगे पाटील यांचे जेवण आणि औषधे तपासून पाहाण्याचा सल्ला दिला होता असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. महाआघाडीतल्या कॉंग्रेस आणि इतर पक्षांनी त्यांच्या जागा निश्चित कराव्यात त्यानंतर आम्ही आम्हाला हव्या असलेल्या जागा त्यांना सांगू त्यानंतर त्यावर निर्णय होईल असेही आंबेडकर यांनी सांगितले. आपण जेव्हा 2004 साली निवडणूक हरलो होतो त्यावेळी आपण ईव्हीएम मशिनवर आरोप केला होता. कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू जिला पॉवर दिली जाते, तिला डीकोडींग करता येते प्रोग्रॅमिंग करता येते. त्यामुळे ईव्हीएम मॅन्युपुलेट होते असाही आरोप आंबेडकर यांनी यावेळी केला.

Published on: Feb 18, 2024 07:15 PM
‘मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण हवं, अन्यथा 21 तारखेला…’, मनोज जरांगे काय म्हणाले
इंदापूर विधानसभेवरुन महायुतीत हमरीतुमरी, हर्षवर्धन पाटील की दत्ता भरणे ?