Video : उद्धव ठाकरे यांच्यासोबत वंचितची युती राहीली नाही, प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य
वंचित बहुजन आघाडीने उद्धव ठाकरे यांच्या सोबत वंचित बहुजन आघाडीची युती राहीली नसल्याचे वक्तव्य केले आहे. आता 26 तारखेपर्यंत आम्ही महाविकास आघाडी आम्हाला किती जागा देतेय ते पाहू अन्यथा आमचा निर्णय घेऊ असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.
मुंबई : उद्धव ठाकरे सोबत वंचितची आता युती राहीलेली नसल्याचे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. महाविकास आघाडीला यामुळे मोठा फटका बसू शकतो असे म्हटले जात आहे. ठाकरे यांच्या सोबतच्या युतीतून आणि महाविकास आघाडीतून जर प्रकाश आंबेडकर यांची वंचित बाहेर पडल्यास राज्यातील राजकीय समीकरणे पुन्हा बदलणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सोबत वंचित बहुजन आघाडीची युती होती. त्यामुळे महाविकास आघाडीबरोबर जाण्यापूर्वी आपण दोघांनी आधी बसले पाहीजे, स्टॅटेजी ठरविली पाहीजे, जागा ठरविल्या पाहीजेत मग महाविकास आघाडीशी बोलणी केली पाहीजेत असे आपण उद्धव ठाकरे यांना सांगितले होते. त्याच्यातील कोणत्याच गोष्टी फॉलो झाल्या नाहीत. आणि ते इंडीपेंडन्टली जाऊन बोलून आले. आता महाविकास आघाडी बरोबर आमचे जमले तर युती, नाहीत तर नाही. 26 तारखेपर्यंत मनाप्रमाणे जागा मिळाल्या नाहीत तर आमचा निर्णय घेऊ असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.