अजित पवार यांच्या शपथविधीवर मनसे नेत्याची टीका; म्हणाला, “मी व्यथित झालो…”

| Updated on: Jul 04, 2023 | 9:00 AM

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी रविवारी बंड पुकारले. राष्ट्रवादीच्या 30 आमदारांसह अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांच्यासोबत नऊ जण शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री झाले. राष्ट्रवादीतील या फुटीनंतर राजकारणात मोठा भूकंप आला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बीड: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी रविवारी बंड पुकारले. राष्ट्रवादीच्या 30 आमदारांसह अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांच्यासोबत नऊ जण शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री झाले. राष्ट्रवादीतील या फुटीनंतर राजकारणात मोठा भूकंप आला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी 35 वर्ष जनसंघ आणि भाजपसोबत राहिलो. कालच्या घटनेनी मी खूप व्यथित झालो आहे. सत्तेसाठी भाजप एवढं पडेल, एवढा राजकीय व्यभिचार करेल हे मला वाटल नव्हतं. सत्तेची लालसा हे भाजपचे धोरण आहे. ईडी ची भीती अजित पवार यांना आहे. म्हणून हे सर्व एकत्रित आले आहेत. कुठल्या तत्वाखाली एकत्रित आले नाहीत,” असं महाजन म्हणाले.

Published on: Jul 04, 2023 09:00 AM
शिवसेना नेत्यावर नारायण राणे चांगलेच संतापले? म्हणाले, ‘ राउत पागल हो गया है, अपनी सोच…’
संजय राऊत यांच्यावर कोणाचे टीकास्त्र? म्हणाला, ‘चिठ्ठी काढणारा पोपट’