औरंगजेबची कबर छत्रपती संभाजीनगरमधून हलवाच; इतिहासाचा संदर्भ देत ‘या’ नेत्याची मागणी

| Updated on: Mar 08, 2023 | 12:05 PM

Prakash Mahajan : एखाद्या व्यक्तीची कबर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्याला इतिहास या नेत्याने सांगितला. पाहा व्हीडिओ...

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादच्या नामांतरानंतर औरंगजेबच्या कबरचा विषय चर्चेत आला आहे. औरंगजेबची कबर हलवा, अशी मागणी केली जातेय. औरंगजेबाची कबर हलवण्यावरून मनसे नेते प्रकाश महाजन यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. कबरी हलवण्याचा इतिहासात मोठा संदर्भ असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. औरंगजेबाची आई मुमताज महल हिची कबर हलवल्याचा संदर्भ त्यांनी दिला आहे. मुमताजचे बऱ्हाणपूरला निधन झालं आणि तिथेच दफन केलं. मात्र कैक वर्षांनी मुमताजची कबर हलवून ताज महालात आणण्यात आली, असा खुलासा प्रकाश महाजन यांनी केला आहे.

Published on: Mar 08, 2023 12:05 PM
एनडीआरएफच्या बदलले आहेत त्यापेक्षा अधिक मदत शेतकऱ्यांना द्या : अजिर पवार
महिला मुख्यमंत्री का नाही? नीलम गोऱ्हे स्पष्टच म्हणाल्या…