ठाकरे गटात आता ती आग राहिली नाही!; कुणी डागलं टीकास्त्र

| Updated on: Mar 08, 2023 | 1:37 PM

Imtiaz Jaleel : मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी ठाकरेगटावर टीका केली आहे. औरंगाबाद नामांतर आणि एमआयएमचं आंदोलन यावरून महाजन यांनी टीका केली आहे. पाहा...

छत्रपती संभाजीनगर : मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी ठाकरेगटावर टीका केली आहे. औरंगाबाद नामांतर आणि एमआयएमचं आंदोलन यावरून महाजन यांनी टीका केली आहे. इम्तियाज जलील यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य अत्यंत निषेधार्ह वक्तव्य आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या लोकांनी इम्तियाज जलील यांच्या घरावर चालून जायला पाहिजे होतं. पण एमआयएमची मतं घेऊन ही लोकं निवडून आले आहेत. त्यामुळे ठाकरे गट काहीही करणार नाही. ठाकरे गटात आता ती आग राहिली नाही, असं महाजम म्हणालेत. शिवाय इम्तियाज जलील यांच्या आंदोलनात दाखवलेला फोटो हा औरंगजेबाचाच होता, असंही महाजन म्हणालेत.

नवाब मलिक यांना तूर्तास दिलासा नाहीच:न्यायालयीन कोठडीत पुन्हा एकदा 14 दिवसांची वाढ
आदित्य ठाकरे यांचं हवाई उड्डाण मंत्र्यांना पत्र, महाराष्ट्रासाठी कोणती महत्त्वाची मागणी?