गोव्यात शपथविधी सोहळा पार पडला, Ravi Naik यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
गोव्याचे 14 वे मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ (Goa CM Oath Taking Ceremony) घेतली आहे.
गोव्याचे 14 वे मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ (Goa CM Oath Taking Ceremony) घेतली आहे. गोव्याचे ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत. राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सावंत कोंकणी भाषेत शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित होते. सावंत यांनी शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं. सावंत यांच्यासोबत विश्वजीत राणे, सुभाष शिरोडकर, मौविन गोडीन्हों, रवि नायक, निलेश काब्रल, रोहण खौंटे, अटॉनोसियो मोन्सेरात आणि गोविंद गौड आदींनाही पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली आहे. या सर्व मंत्र्यांचा आज संध्याकाळपर्यंत खातेवाटप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच सावंत हे लवकरच कॅबिनेटची बैठक बोलावणार असून त्यात काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.