“हिमंत असेल तर मी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतो”, भाजप नेत्याचं आव्हान
उद्धव ठाकरे यांची दोन दिवस प्रखर मुलाखत प्रसारित झाली. ही मुलाखत संजय राऊत यांनी घेतली होती. या मुलाखतीतून उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र डागलं. उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीनंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे.
मुंबई, 28 जुलै 2023 | ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दोन दिवस प्रखर मुलाखत प्रसारित झाली. ही मुलाखत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी घेतली होती. या मुलाखतीतून उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र डागलं. उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीनंतर भाजप आणि शिवसेने त्यांच्यावर पलटवार केला आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा… त्यांनी हिंदुत्वाशी तडजोड केली आणि आज ही अवस्था झाली आहे. मी त्यांना हा शब्दकोश भेट देणार आणि यातून त्यांना समजेल की शब्द कोणते वापरायचे… कसं बोलायचं.उद्धव ठाकरे यांची मुलाखत बोगस आहे. ही मुलाखत घेणारा वेडा आहे आणि मुलाखत देणाराही वेडा आहे. त्या मुलाखतीला काहीही अर्थ नाहीये. हिंमत असेल तर मी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतो त्यांनी उत्तर द्यावी. आम्ही कुणाला घाबरत नाही. कुणाला घाबरण्याचं कारण नाही. उद्धव ठाकरे स्वत:च घाबरून घरी बसले आहेत. आमचे राम आमच्याकडेच आहे तुमचे राम दिल्लीत अशी ठाकरेंची अवस्था आहे. जितेंद्र आव्हाड काही बोलले तरी 17 आमदारांमध्ये त्यांचं ही नावं आहे. लवकरच ते सुद्धा आमच्याकडेच दिसतील. उद्धव ठाकरे यांना उपचारांची गरज आहे.”