Prasad Lad : बॅनर फाडल्याच्या घटनेवर आदित्य ठाकरेंचं उत्तर म्हणजे बालिशपणाचं लक्षण, प्रसाद लाड यांचा टोला

| Updated on: Sep 04, 2022 | 5:07 PM

बॅनर (Banner) कोणी लावले, यापेक्षा त्यामागची भावना काय आहे, हे समजून घेतले पाहिजे. ते सोडून त्यावर आदित्य ठाकरे जे उत्तर देतात, हे अत्यंत बालिशपणा आहे. ताकद, बॅनर फाडणे या गोष्टी आम्ही फार आधी केल्या आहेत. त्यामुळे आम्ही फार महत्त्व त्यास देत नाहीत, असे प्रसाद लाड म्हणाले.

मुंबई : बॅनर फाडण्याची छिछोरेगिरी उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) शिवसेनाच करू शकते. बॅनर फाडण्याचे आम्ही ठरवले तर मातोश्रीच्या समोरचे बॅनरही आम्ही फाडू शकतो. पण आमची ती संस्कृती नाही, असे भाजपा नेते प्रसाद लाड (Prasad Lad) म्हणाले आहेत. शिवसैनिक आणि भाजपा यांच्यात सध्या बॅनरवरून सामना सुरू आहे. एकमेकांचे बॅनर काढले आणि फाडले जात आहेत. यावर लाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गणपती बाप्पाचा बॅनरवर फोटो आहे. गणपती बाप्पाच्या माध्यमातून या राज्यातल्या तमाम गणेशभक्तांचे स्वागत केले आहे. ते बॅनर (Banner) कोणी लावले, यापेक्षा त्यामागची भावना काय आहे, हे समजून घेतले पाहिजे. ते सोडून त्यावर आदित्य ठाकरे जे उत्तर देतात, हे अत्यंत बालिशपणा आहे. ताकद, बॅनर फाडणे या गोष्टी आम्ही फार आधी केल्या आहेत. त्यामुळे आम्ही फार महत्त्व त्यास देत नाहीत, असे प्रसाद लाड म्हणाले.

Published on: Sep 04, 2022 03:57 PM
Neelam Gorhe : कोण कुठल्या भाषेत बोलतं, यापेक्षाही जनादेश महत्त्वाचा; नीलम गोऱ्हेंचा आशिष शेलारांना टोला
Devendra Fadnavis Meet Governors | फडणवीसांनी राज्यपालांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेतलं