“उद्धव ठाकरे यांची परिस्थिती म्हणजे येड लागलंय बाळ्याला”; भाजप नेत्याचा हल्लाबोल

| Updated on: Aug 08, 2023 | 3:05 PM

ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. आंब्याच्या पेटीत एकजरी सडका आंबा जरी असेल तरी तो संपूर्ण पेटी नासवतो. त्यामुळे आपण सडके आंबे लांब केले, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावर आता भाजप नेते प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई, 8 ऑगस्ट 2023 | ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. आंब्याच्या पेटीत एकजरी सडका आंबा जरी असेल तरी तो संपूर्ण पेटी नासवतो. त्यामुळे आपण सडके आंबे लांब केले, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावर आता भाजप नेते प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “पेटीत उद्धव नावाचा आणि आदित्य नावाचा कुस्का आंबा होता, आणि एकनाथ शिंदे यांनी या पेटीतून हे दोन कुस्ती आंबे बाहेर काढले आणि संपूर्ण पेटी चांगली केली. उद्धव ठाकरे यांची येड लागलंय बाळाला अशी परिस्थिती झाली आहे, उद्धव ठाकरेंची जर मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती तर मग संजय राऊत, एकनाथ शिंदे यांना का मुख्यमंत्री केलं नाही ? जर मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर त्यावेळी देवेंद्रजींना मुख्यमंत्री करायचा होत. उद्धव ठाकरे यांचे खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे आहेत.” तसेच उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना फोन करणार असल्याच्या चर्चांवर देखील प्रसाद लाड यांनी भाष्य केलं आहे.

 

Published on: Aug 08, 2023 03:05 PM
‘त्यांचं, नाचता येईना अंगण वाकडं असं झालंय’; कोणी केलीय संजय राऊत यांच्यावर टीका
‘संजय राऊत यांना भविष्य सांगण्याची सवय, पण त्याला कवडीची किंमत नाही’, शिंदे गटातील आमदारानं डिवचलं