“आम्ही एक दावा ठोकला तर संजय राऊतांना रोज कोर्टात जावं लागेल, पण आम्ही नादी लागत नाही”

| Updated on: Feb 04, 2023 | 7:40 AM

शिंदेगटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी शिवसेना ठाकरेगटाचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका केलीय. पाहा ते काय म्हणालेत...

शिंदेगटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी शिवसेना ठाकरेगटाचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका केलीय. संजय राऊत सकाळचा भोंगा आहे. तीच त्यांची राज्यात आणि देशात ओळख आहे. संजय राऊतांवर मानहानीचा दावा ठोकला तर राऊतांना रोज कोर्टात जावं लागेल. पण आमचाही वेळ जाईल म्हणून आम्ही नादी लागत नाही, असं प्रतापराव जाधव म्हणालेत. संजय राऊत तर रोज उठून खोटेनाटे आरोप करतात. संजय राऊत आणि आदित्य ठाकरे आयत्या पीठावर रेघोट्या मारणारे आहेत यांचं शिवसेनेसाठी योगदान काय?, असंही ते म्हणालेत.

सत्यजित तांबे भाजपमध्ये येणार? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…
मुंबई महापालिकेचा आज अर्थसंकल्प, यासह जाणून घ्या इतर घडामोडी