नाना पटोलेंच्या ‘त्या’ आरोपांवर प्रतापराव जाधव यांची टीका; म्हणाले, “काँग्रेसने असे आरोप करणे म्हणजे…”
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार प्रतापराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बुलढाणा: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली. “शिंदे-फडणवीस यांच्या दिल्ली वाऱ्या पाहिल्या तर एक पाय महाराष्ट्र दुसरा पाय दिल्लीत आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे दिल्लीचे हस्तक आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार न होणे हा लोकशाहीचा खऱ्या अर्थाने घात आहे.एक पालकमंत्री सात-सात जिल्ह्याच्या कार्यभार सांभाळत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे दिल्लीत जाऊन मुजरेगिरी करतात”, अशी टीका नाना पटोले यांनी केली. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार प्रतापराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “दिल्लीच्या नेत्यांची हुजरेगिरी करणे असा आरोप काँग्रेसने करणे म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा आहेत. यापूर्वी याच लोकांनी अनेकांनी इंदिरा गांधी , राजीव गांधी, सोनिया गांधी अलीकडे राहुल गांधी यांचे जोडे-चपला उचलल्या आहेत. महाराष्ट्राची इभ्रत त्यांनी घातली आहे. त्यामुळे त्यांनी असा आरोप करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत”, असं ते म्हणाले.