‘तर मी आणि दरेकर राजीनामा द्यायला तयार,पण जरांगे यांनी…,’ काय म्हणाले प्रसाद लाड
भाजपाचे नेते प्रसाद लाड आणि मराठा आरक्षण आंदोलक नेते जरांगे पाटील यांच्या जोरदार शाब्दीक चकमकी झडत आहेत. फडणवीस यांची बाजू घेणाऱ्या प्रसाद लाड यांच्यावर मनोज जरांगे यांनी टिका करताना हवे तर प्रसाद लाड यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी लग्न करावे असाही टोला लगावला आहे.
मनोज जरांगे यांनी आमदार होऊन विधानसभेत भूमिका मांडावी, त्यांनी समाजकारणात राजकारण आणू नये,त्यांनी विरोधकांनी भूमिका मांडू नये. हवे तर मी आणि प्रवीण दरेकर हे राजीनामा द्यायला तयार आहोत असे भाजपा नेते प्रसाद लाड यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे यांनी येत्या 20 तारखेपासून उपोषणाची घोषणा केली आहे. जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांच्यावर जोरदार टिका केली होती. देवेंद्र फडणवीस यांची थूंकी झेलणारा अशा शब्दात जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांच्यावर जोरदार हल्ला केला होता. जरांगे पाटील नुकताच मराठवाड्यात दौरा काढला होता. त्यांनी यानंतर दुसरा दौऱ्यांची घोषणाही केलेली आहे. येत्या काही दिवसांत आपण विधानसभेला 288 आमदारांपैकी कोणाला पाडायचं किंवा स्वत:चे आमदार उभे करायचे याचा निर्णय समाजाशी बोलणं करुन ठरविणार असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले होते.
Published on: Jul 21, 2024 03:10 PM