“अजित पवारांना ठाकरेंची सर्वात जास्त काळजी”, भाजपच्या ‘या’ नेत्याची टीका
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी या निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट केली."मुंबईतील लोकांना ठाकरे गटाबाबत सहानुभूती आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुका या एकत्र लढण्याबाबतची ठाकरेंसोबत चर्चा करणार आहे", असं अजित पवार म्हणाले.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी या निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट केली.”मुंबईतील लोकांना ठाकरे गटाबाबत सहानुभूती आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुका या एकत्र लढण्याबाबतची ठाकरेंसोबत चर्चा करणार आहे”, असं अजित पवार म्हणाले.यावर प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मला असं वाटतं की, उद्धव ठाकरे यांची अजित पवार यांना सर्वात जास्त काळजी आहे. महाविकास आघाडीचे लोक एकमेकांवर टीका करतात आणि एकमेकांचं काळजी पण घेतात.पुतण्या मामीचं हे प्रेम आहे. संजय राऊत त्यांचे कपडे काढणार आणि ते संजय राऊत यांच्यावर बोलणार आणि पुन्हा एकमेकांची काळजी पण करणार, असं प्रवीण दरेकर म्हणाले.
Published on: Jun 05, 2023 11:28 AM