Pravin Darekar : आता का नाकानं कांदे सोलत आहात? याकुब मेमन कबरीच्या राजकारणावरून प्रवीण दरेकरांचा शिवसेनेवर निशाणा

| Updated on: Sep 10, 2022 | 4:17 PM

याकुब मेमनच्या कबरीवरून राज्यात राजकारण सुरू झाले आहे. यासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच जबाबदार असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

मुंबई : याकुब मेननच्या कब्रीचे उदात्तीकरण करून आता तुम्ही नाकानं कांदे कशाला सोलत आहात, असा सवाल प्रवीण दरेकर (Pravin Darekar)  यांनी करत शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) या रौफ मेमनला कशाला भेटल्या, असे दरेकर यांनी विचारले आहे. याकुब मेमनच्या कबरीवरून राज्यात राजकारण सुरू झाले आहे. यासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दसरा मेळाव्यावरही त्यांनी मत व्यक्त केले आहे. बाळासाहेबांचे विचार राज ठाकरेच (Raj Thackeray) ताकदीने मांडू शकतात. बाळासाहेब ठाकरे वर्षानुवर्ष अशा सभा घ्यायचे. तर शिंदे गट हा बाळासाहेबांचे विचार घेऊन जाणारा पक्ष आहे. व्यक्तीपेक्षा, पक्षापेक्षा बाळासाहेबांचे विचार हे पुढे गेले पाहिजेत. राज ठाकरे यांना बाळासाहेब जवळून माहिती आहेत. इतरांच्या तुलनेत ते कधीही बेस्ट आहेत, असे दरेकर म्हणाले.

Ulhasnagar Robber Arrested | मंदिरात दरोडा घालणाऱ्या टोळीला पोलिसांनी शिताफीने केली अटक
Varsha Bhoyar : पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या नवनीत राणांवर अद्याप गुन्हा का दाखल नाही? पोलीस पत्नीचा सवाल